व्ही. शांताराम फाऊंडेशन

व्ही. शांताराम फाऊंडेशनची स्थापना व्ही. शांताराम यांच्या हस्ते १८ नोव्हेंबर १९७७ रोजी झाली आहे. फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेले काही प्रमुख कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत:

१) चित्रपती व्ही. शांताराम यांच्या जीवनविषयक पुस्तक आणि माहितीपट 

अ) 'शांतारामा' फाऊंडेशनच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले पहिले पुस्तक. चित्रपती व्ही. शांताराम यांचे आत्मकथन. मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तीनही भाषांमध्ये प्रकाशित. 'शांतारामा'चे प्रकाशन १० एप्रिल १९८६ रोजी झाले. 

ब) 'द पोट्रेट ऑफ अ पायोनिअर' चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांच्यावरील जीवनपट. यामध्ये १९२० ते १९९० या कालावधीतील सत्तर वर्षाच्या त्यांच्या वाटचालीचा वेध. 

क) 'द लिगसी ऑफ रॉयल लोटस्' या चरित्र विषयक पुस्तकाचे प्रकाशन. सहलेखक किरण व्ही. शांताराम. 

२) व्ही. शांताराम पुरस्कार 

१८ नोव्हेंबर या व्ही. शांताराम यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा पुरस्कार देण्यात येतो. १९९३ साली या पुरस्काराची सुरूवात झाली. पहिला पुरस्कार सोहळा, राजकमल स्टुडिओ, परळ येथे झाला. यामध्ये उत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शनाचे व निर्मितीचे प्रत्येकी तीन पुरस्कार देण्यात येतात. सामाजिक संदेश, प्रबोधन, मार्गदर्शन व मनोरंजन यांचा योग्य समन्वय साधणाऱ्या सर्व भारतीय भाषेतील चित्रपटांचा या पुरस्कारांसाठी विचार केला जातो. समाजाचे स्वच्छ मनोरंजन करणाऱ्या चित्रपटांचा या पुरस्कारांसाठी विशेष विचार केला जातो. 


३) ग्रंथसंग्रहालय, नोंदी-सूची तपशील याची संगणक सुविधा. 

भारतीय चित्रपटाचा जन्म, वाटचाल व इतिहास याबाबतचे शंभर वर्षाचे तपशील संगणकावर उपलब्ध. विशेष म्हणजे, त्यामध्ये नियमितपणे नवीन तपशीलाची भर पडत आहे.... 

अ) चित्रपटाची भाषा, सेन्सॉर प्रमाणपत्राचे तपशील, लांबी, कृष्ण धवल अथवा रंगीत याचे स्वरूप इत्यादी (चित्रपट १६ एमएम, ३५  एमएम की ७० एमएम याची माहिती) 

ब) चित्रपटाचे स्वरूप, संगीतकार, गीतकार, पार्श्वगायक, संगीत हक्क इत्यादीचे तपशील. 

क) फाऊंडेशनच्या वतीने इतर काही लेखकांची पुस्तके प्रकाशित  करण्यात आली. वसंत साठे यांचे ‘बखर सिनेमाची’, श्रीकांत बोजेवार यांचे ‘वास्तववादी सिनेमा’. तसेच ‘अराव्हयल ऑफ सिनेमा इन इंडिया’ ही संजित नार्वेकर संकलित पुस्तिका. 

ड) पारितोषिक संदर्भातील तपशील राज्य व राष्ट्रीय पारितोषिकाबाबत सर्व तपशीलवार माहिती. 

इ) फाऊंडेशनकडे चित्रपटविषयक पुस्तकांचा मोठा खजिना आहे. 

ई) प्रतिष्ठानच्या वाचनालयात एकूण दहा हजार पुस्तके असून त्यात भारतीय सिनेमा व सिनेमासृष्टी यावरील पाच हजार पुस्तकांचा समावेश आहे. 

ऊ) ट्रेड गाईड व ट्रेड इन्फर्मेशन या चित्रपटसृष्टीच्या व्यवसायविषयक माहिती देणाऱ्या साप्ताहिकाचे सर्व अंक उपलब्ध. 

क) प्रतिष्ठानच्या वतीने चित्रपट समीक्षा व अभ्यास यांचे अभ्यासक्रम घेण्यात येतात. कोल्हापूर स्कूल संबंधात चर्चासत्राचे आयोजन. 

व्ही. शांताराम फाऊंडेशनच्या वतीने भविष्यातील उपक्रम 

फाऊंडेशनची वेबसाईट सुरू करण्यात येईल. त्यात आतापर्यंतच्या मराठी व हिंदी चित्रपटांची सविस्तर माहिती उपलब्ध होईल.  ऑडिओ-व्हिजुअल अर्थात ‘दृश्य-संवाद’ माध्यम सुरू करण्यात येईल. त्यातून चित्रपटविषयक विविधरंगी माहिती दिली आहे. चित्रपटसृष्टीतील बुजुर्ग कलाकारांच्या सविस्तर मुलाखती घेतल्या जाऊन त्यादेखील ऑनलाईन स्वरूपात प्रकाशित केल्या जातील. या मुलाखती म्हणजे त्यांचे आत्मकथन असेल व त्यातून त्या मान्यवरांच्या 'यशोगाथे'चा मागोवा घेतला जाईल.