सनावळी
१९०१ ते १९२९
१८ नोव्हेंबर १९०१, कोल्हापूर येथे जन्म
२० जून १९२०, ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’त प्रवेश
९ जून १९२२, अंबू मुगळखोड हिच्याशी विवाह
३० एप्रिल १९२९, ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ सोडली
१९२९ ते १९४२
१ जून १९२९, 'प्रभात' कंपनी-कोल्हापूर येथे स्थापना
९ ऑगस्ट १९२९, ज्येष्ठ पुत्र प्रभातकुमारचा जन्म
११ सप्टेंबर १९३१, कन्या सरोजचा जन्म
नोव्हेंबर १९३३, 'प्रभात'चे पुण्यास स्थलांतर
६ ऑगस्ट १९३७, कन्या मधुराचा जन्म
२५ जानेवारी १९३९, बंधू रामकृष्णचे निधन
१५ जुलै १९४०, मद्रासच्या ‘प्रभात टॉकीज’चे उद्घाटन
२२ ऑक्टोबर १९४१, जयश्रीबाईंशी विवाह
१९४१, फिल्म ऍडवायजरी बोर्ड-चीफ प्रोड्युसर
१३ एप्रिल १९४२, ‘प्रभात फिल्म कंपनी’ सोडली
१९४२ ते १९५७
२५ ऑगस्ट १९४२, 'सिल्व्हर स्क्रीन एक्स्चेंज' स्थापना
१८ ऑक्टोबर १९४२, 'वाडिया मूव्हिटोन'चे पोटभाडेकरू
९ नोव्हेंबर १९४२, ‘राजकमल कलामंदिर'ची स्थापना
डिसेंबर १९४२, ‘सेन्सॉर समिती’चे प्रमुखपद
२९ मार्च १९४३, कन्या चारुशीला हिचा जन्म
२६ जून १९४३, पुत्र किरण याचा जन्म
८ ऑक्टोबर १९४४, कन्या राजश्री हिचा जन्म
जुलै १९४६, अमेरिका प्रवास
१९ ऑगस्ट १९४७, मास्टर विनायक यांचे निधन
डिसेंबर १९४७, ‘फिल्म्स डिव्हिजन’ प्रमुख निर्मातापदी नेमणूक
२० डिसेंबर १९४७, कन्या तेजश्रीचा जन्म
५ मे १९४९, 'वाडिया मूव्हिटोन' च्या जमिनीची खरेदी
२३ फेब्रुवारी १९५३, सरोज-सोराब इंजिनिअर विवाह
१४ जुलै १९५३, प्रभातकुमार-उषा पाटोळे विवाह
१३ ऑक्टोबर १९५३, 'प्रभात'चे दिवाळे
२६ फेब्रुवारी १९५४, 'फिल्म प्रोड्युसर्स गिल्ड'ची स्थापना
फेब्रुवारी १९५४, 'फिल्म्स डिव्हिजन'चे प्रमुख निर्मातापद
१९५५, ‘चिल्ड्रन फिल्म सोसायटी’चे संस्थापक सदस्य
१३ नोव्हेंबर १९५६, जयश्रीशीबाईंशी घटस्फोट
२२ डिसेंबर १९५६, विजया देशमुख (संध्या) विवाह.
१९५७, डोळ्यांवरील शस्त्रक्रिया
१९५७ ते १९९०
१९५९, ‘रॉ स्टॉक स्टिअरिंग कमिटी’चे अध्यक्षपद
१९६०, ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सेन्सॉर’चे सदस्यत्व
१९ मार्च १९६२, मधुरा-पंडित जसराज विवाह
३१ डिसेंबर १९६२, वडील राजाराम वणकुद्रे यांचे निधन
५ सप्टेंबर १९६३, आई कमलाबाई वणकुद्रे कालवश
१० मार्च १९६४, चारुशीला-सुब्रत रे विवाह
१९६६, ‘फिल्म प्रोड्युसर्स गिल्ड’चे अध्यक्षपद
१९६६, ‘मराठी चित्रपट महामंडळा’ची स्थापना, अध्यक्षपद
१० नोव्हेंबर १९६६, ‘कोल्हापूर नगरपालिके’तर्फे सत्कार
३१ डिसेंबर १९६६, किरण-ज्योती भट विवाह
१४ मे १९६७, तेजश्री-शशांक दोशी विवाह
९ नोव्हेंबर १९६७, बाबूराव पेंढारकरांचे देहावसान
२७ नोव्हेंबर १९६७, राजश्री-ग्रेगरी चॅपमन विवाह
९ ऑगस्ट १९७१, मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या हस्ते सत्कार
१९७२, ‘फिल्म प्रोड्युसर्स कौन्सिल’ची स्थापना
१६ डिसेंबर १९७२, ‘बृहन्मुंबई महानगरपालिके’तर्फे सत्कार
१८ नोव्हेंबर १९७७, 'व्ही. शांताराम प्रतिष्ठान'ची स्थापना
१ जून १९७९, 'प्रभात'च्या सुवर्णजयंती - अध्यक्षपद
८ जून १९७९, ‘पुणे महानगरपालिके’तर्फे सत्कार
७ जून १९८०, ‘नागपूर विद्यापीठा’तर्फे डॉक्टरेट
मार्च १९८२, मराठी बोलपटांची सुवर्णजयंती-अध्यक्षपद
मार्च १९८२, राष्ट्रीय फिल्म महोत्सव पारितोषिक-अध्यक्षपद
१० एप्रिल १९८६, 'शांतारामा' हे आत्मचरित्र प्रकाशित
१३ जून १९८६, दादासाहेब फाळके पारितोषिक